मा. श्री. मुकेश सोनु सारवान, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबई यांची भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेला भेट महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज मंगळवार दि. ०२.०६.२०२६ रोजी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेला भेट देऊन सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त तसेच आस्थापना विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची स्थिती तपासण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांसाठीची श्रमसाफल्य योजना, दुषित गटारामध्ये काम करतांना मृत्यु पावलेल्या/ कायम अपंगत्व/ अपंगत्व आलेल्या मॅन्युअल स्कॅव्हेंजर्सना/ सफाई कामगांराना नुकसान भरपाई अदा करणेबाबत प्रकरणांची सद्य:स्थिती, वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांची माहिती व सफाई कामगारांची मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदे इत्यादीचा आढावा घेण्यात आला तसेच, सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकी दरम्यान कर्मचारी संघटना यांनी महाराष्ट्र राज्य सफाई कर...