Skip to main content

विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही, कारण त्याचे सर्वात मोठे सामर्थ्य प्रेम, करुणा आणि भक्ती आहे

 

                  *जगजेठी विठ्ठल*     

                                          *जो आवडे सर्वांना*



"विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही, कारण त्याचे सर्वात मोठे सामर्थ्य प्रेम, करुणा आणि भक्ती आहे."

"जो देव निशस्त्र आहे, तोच भक्ताच्या मनावर प्रेमाने राज्य करतो."

"विठ्ठल म्हणजे शांततेचे प्रतीक; त्याच्या निशस्त्र रूपातच मानवतेचा महान संदेश दडलेला आहे."


"विठ्ठलाचा टिळा कपाळावरच नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो." 

"विठ्ठलाचा टिळा म्हणजे भक्ती, सत्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारे तेज."

"कपाळावरील विठ्ठलाचा टिळा सांगतो—मार्ग नेहमी धर्माचा, विचार नेहमी मानवतेचा."

"विठ्ठलाचा टिळा हा केवळ चिन्ह नाही, तर चांगल्या विचारांचा आणि सत्कर्मांचा संकल्प आहे." 


"विठ्ठलाचे कमरेवरील हात सांगतात—हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध रहा." 

"विठ्ठलाच्या कमरेवरील हातांचा संदेश—संकल्प करा, कर्तव्य स्वीकारा आणि पूर्णत्वापर्यंत निष्ठेने चला."

"विठ्ठल शिकवतो—कर्तव्य स्वीकारा, धैर्याने उभे राहा आणि कार्य पूर्ण होईपर्यंत मागे हटू नका."


पुंडलिकाने आई-वडिलांच्या सेवेला देवापेक्षा मोठे स्थान दिले; म्हणूनच विठ्ठल आजही त्या विटेवर उभा राहून सांगतो—जन्मदाते आई-वडील हेच खरे देव आहेत." 

"विठ्ठलाची वीट हा संदेश देते—जिथे आई-वडिलांची सेवा आहे, तिथेच देवाचे वास्तव्य आहे."

"पुंडलिकाच्या मातृ-पितृसेवेने विठ्ठलाला विटेवर उभे केले; हा आदर्श प्रत्येकाने आचरणात आणावा."



"विठ्ठल सांगतो—देव शोधण्यापूर्वी आई-वडिलांच्या चरणी सेवा करा; तिथेच माझे दर्शन आहे."

 

तुळस ही खरोखरच भरपूर ऑक्सिजन देणारी एक आरोग्यदायी, जंतूंचा नाश करणारी, घरात सकारात्मकता व सदाचार (पवित्रता) जपणारी अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये तिला 'वृक्षमाता' किंवा जीवनाचे औषध मानले जाते.

तुळशीचे मूळ,खोड, मंजिरी, बीज आणि पाने असे पाच पंचांग आरोग्यदायी आहेत.  

तुळशी माळा गळ्यात धारण केल्याने मन सदाचारी होते. वाईट व्यसनांपासून दूर राहते. जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल होतो, म्हणून विठ्ठलाला तुळशीच्या माळा वाहतात.

निसर्गातील वनस्पती बहुमोल आहेत.

हे संत तुकारामांनी आपल्या अभंगातून सांगितलेच आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.....

म्हणूनच आपला एकही सण वनस्पती शिवाय पूर्ण होत नाही.


एका भोळ्या कोळी भक्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना स्वतः पकडलेले दोन मासे प्रेमाने भेट म्हणून आणले. तो मच्छिमार असल्यामुळे आणि देवाला मासे अर्पण करत असल्याचे पाहून काही लोकांनी त्याला मंदिरात जाण्यापासून रोखले. त्यांनी त्याला पाप लागेल असे सांगितले.

परंतु त्या कोळी भक्ताने लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्याच्या मनात विठ्ठलाबद्दल अपार श्रद्धा आणि निर्मळ प्रेम होते. भक्ताच्या या निखळ भावनेने प्रसन्न होऊन पांडुरंग स्वतः मंदिराबाहेर आले आणि त्या भक्ताने प्रेमाने अर्पण केलेली भेट स्वीकारली.

त्या भक्ताच्या प्रेमाचा आणि श्रद्धेचा सन्मान म्हणून विठ्ठलाने ते मासे आपल्या कानात कुंडलांसारखे धारण केले, अशी भक्तीपरंपरेत कथा सांगितली जाते. म्हणूनच विठ्ठलाच्या कानातील माशांच्या आकाराची मकरकुंडले एका भोळ्या कोळी भक्ताच्या निस्वार्थ भक्तीचे प्रतीक मानली जातात.

या कथेतून संदेश मिळतो की, देवासाठी मौल्यवान वस्तूंपेक्षा भक्ताचे निर्मळ प्रेम, श्रद्धा आणि भाव अधिक महत्त्वाचा असतो.

 परमेश्वर कोणातही जात, व्यवसाय किंवा उचनीच असा भेद करत नाही; सर्व भक्त त्याच्यासाठी समान असतात.


संत शेख मोहम्मद हे वारकरी परंपरेतील एक महान संतकवी होते. ते मुस्लिम समाजातून आले असले तरी त्यांची अखंड भक्ती श्रीविठ्ठलाच्या चरणी होती. त्यांनी आपल्या अभंग आणि ग्रंथांमधून ईश्वर एक आहे, मानवता आणि भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे हा संदेश दिला.

त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ "योगसंग्राम" आणि "पवनविजय" मानले जातात.

 त्यांनी जात-पात, धर्मभेद यांना नाकारून भक्ती, सदाचार आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यामुळे संत शेख मोहम्मद हे विठ्ठलाच्या सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानले जातात. 


संत कान्होपात्रा या विठ्ठलाच्या अनन्य भक्त संत कवयित्री होत्या. त्या मंगळवेढा येथील होत्या. त्यांनी सांसारिक बंधने आणि अडचणींना न जुमानता आपले संपूर्ण जीवन विठ्ठलभक्तीस अर्पण केले.

त्यांच्या अभंगांमध्ये विठ्ठलावरील अपार प्रेम, शरणागती आणि भक्तीची भावना दिसून येते. 

परंपरेनुसार, त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल चरणी अखेरचा आश्रय घेतला.

संत कान्होपात्रा आणि संत शेख मोहम्मद यांचा संदेश एकच आहे—विठ्ठलाच्या भक्तीमध्ये जात, धर्म, लिंग किंवा सामाजिक भेद नसतात; निर्मळ प्रेम आणि श्रद्धाच देवाला प्रिय असते.


विठ्ठलाच्या दरबारात जात, धर्म, पंथ यांचा भेद नाही; भक्ती हाच सर्वांचा समान धर्म आहे." 

"गोरोबा कुंभार, सावता माळी, नामदेव शिंपी, सेना न्हावी, नरहरी सोनार, चोखामेळा, ज्ञानेश्वर, तुकाराम, कानोपात्रा, शेख मोहम्मद—सर्वांना समान प्रेम देणारा विठ्ठल म्हणजे सर्वधर्मसमभावाचे जिवंत प्रतीक."


"विठ्ठलाच्या चरणी जाती नाहीत, श्रेष्ठ-कनिष्ठ नाही; तिथे फक्त भक्त आणि भगवंत यांचे प्रेम असते."

"वारकरी संप्रदाय शिकवतो—भेदभाव विसरा, समतेने जगा; हाच विठ्ठलाचा खरा संदेश आहे."

"विठ्ठल सर्वांचा आहे; म्हणूनच त्याच्या भक्तांमध्ये समाजातील प्रत्येक घटकाचे संत तेजाने उजळून निघाले."

"संतांची विविधता आणि विठ्ठलाची एकता—यालाच सर्वधर्मसमभाव म्हणतात." 🌿🙏


✍️दीपिका रामचंद्र निकाळजे

9821837556

🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏 

       मेरा देश मेरा वतन समाचार 

                    🙏 पत्र के🙏

        संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी

नोट........ 👉🙏

 दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏

जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏

#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏


Comments

Popular posts from this blog

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी)

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी) वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना: सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के संपर्क विवरण वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना भारत सरकार की एक महत्वपूर्ण पहल है, जो राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) के तहत लाभार्थियों को देशभर में किसी भी उचित मूल्य की दुकान (FPS) से सब्सिडी वाले अनाज प्राप्त करने की सुविधा प्रदान करती है। यह योजना सभी 36 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में लागू है, जिसमें असम हाल ही में शामिल हुआ है। योजना के तहत राशन कार्ड को आधार से सीड करने की आवश्यकता होती है। योजना से संबंधित शिकायतों, जानकारी या सहायता के लिए राष्ट्रीय स्तर पर टोल फ्री हेल्पलाइन नंबर 14445 उपलब्ध है। इसके अलावा, सामान्य PDS हेल्पलाइन नंबर 1967 है। कुछ राज्यों में अतिरिक्त स्थानीय नंबर भी हैं। नीचे सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के मुख्य संपर्क विवरण दिए गए हैं (मुख्यालय का पता, फोन नंबर और ईमेल जहां उपलब्ध)। ये विवरण आधिकारिक स्रोतों से संकलित हैं। यदि आपको मोबाइल नंबर की आवश्यकता है, तो आधार से लिंक्ड रजिस्टर्ड मोबाइल का उपयोग करें, क्योंकि योजना में...

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी प्रचार (campaign) बंद होण्याची तारीख आणि वेळ: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ही निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे (मतदान ७:३० AM ते ५:३० PM पर्यंत).

 भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। 29 महानगरपालिकाओं (जिसमें BNCMC भी शामिल है) के लिए एक ही चरण में चुनाव हो रहे हैं। सामान्य नियमों के अनुसार, प्रचार मतदान शुरू होने से ठीक पहले मतदान के दिन सुबह 7:30 बजे तक बंद हो जाता है (यानी 15 जनवरी 2026 को सुबह 7:30 बजे से प्रचार पूरी तरह प्रतिबंधित)। कुछ स्थानीय निकायों में प्रचार पिछले दिन रात 10 बजे तक बंद होता है, लेकिन महानगरपालिका चुनावों (जैसे BMC, BNCMC आदि) के लिए आधिकारिक रूप से प्रचार समाप्ति मतदान शुरू होने के समय (15 जनवरी सुबह 7:30 बजे) मानी जाती है। मुख्य तिथियाँ (संक्षेप में): नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि: 30 दिसंबर 2025 नामांकन की जांच: 31 दिसंबर 2025 नाम वापसी की अंतिम तिथि: 2 जनवरी 2026 अंतिम उम्मीदवार सूची: 3 जनवरी 2026 मतदान: 15 जनवरी 2026 (7:30 AM से 5:30 PM) मतगणना: 16 जनवरी 2026 प्...

भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल

  भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल भिवंडी, 10 अगस्त 2026: भिवंडी-निजामपुर शहर महानगरपालिका में काम करने वाले अधिकारियों और कर्मचारियों की ओर से महाराष्ट्र राज्य जाति कर्मचारी कल्याण महासंघ  ने अनिश्चितकालीन हड़ताल का अंतिम नोटिस जारी किया है। महासंघ का कहना है कि पिछले कई वर्षों से लंबित सेवा लाभ और पदोन्नतियां न मिलने के कारण कर्मचारियों का धैर्य अब जवाब दे चुका है। महासंघ के  अध्यक्ष दीपक राव द्वारा जारी पत्र में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सुमित्राअजित पवार समेत राज्य सरकार के वरिष्ठ अधिकारियों तथा भिवंडी महानगरपालिका प्रशासन को चेतावनी दी गई है।  पत्र में कहा गया है कि इस नोटिस की प्राप्ति से 30 दिनों के अंदर सभी लंबित मांगें पूरी नहीं हुईं तो आवश्यक सेवाओं सहित अनिश्चितकालीन हड़ताल की जाएगी। प्रमुख मांगें छठे और सातवें वेतन आयोग के लंबित अंतर (एयरियर्स) एश्योर्ड प्रोग्रेस स्कीम के तहत 12 और 24 वर्ष की सेवा पूरी करने पर म...