Skip to main content

*कृषी विभागाचे सचिव श्री. परिमल सिंह यांची शहापूर तालुक्यातील आदिवासी भागास भेट* *'अ‍ॅग्रीस्टॅक' फार्मर आयडी व शाश्वत शेती पद्धतींची केली पाहणी* *वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांनाही मिळणार 'फार्मर आयडी'; पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी बंधनकारक*

 *कृषी विभागाचे सचिव श्री. परिमल सिंह यांची शहापूर तालुक्यातील आदिवासी भागास भेट* 


*'अ‍ॅग्रीस्टॅक' फार्मर आयडी व शाश्वत शेती पद्धतींची केली पाहणी*


*वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांनाही मिळणार 'फार्मर आयडी'; पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी बंधनकारक*



ठाणे,दि.8 जून 2026: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व कृषी योजनांच्या लाभासाठी 'अ‍ॅग्रीस्टॅक' (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी (Farmer ID) नोंदणी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वी केवळ ७/१२ उतारा असलेल्या शेतकऱ्यांचीच ही नोंदणी होत होती, मात्र आता वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी मिळणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.    

     आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (TRTI) मार्फत ज्या वनपट्ट्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांचा डेटा 'अ‍ॅग्रीस्टॅक' पोर्टलला जोडण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व वनपट्टाधारक व इतर शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन किंवा कृषी व महसूल विभागामार्फत गावोगावी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कॅम्पमध्ये उपस्थित राहून आपली नोंदणी तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    सचिव श्री.परिमल सिंह यांच्याकडून "थेट शेतकऱ्यांशी संवाद" या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर,  ६ जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी व पदुम विभागाचे सचिव श्री. परिमल सिंह यांचा शहापूर तालुक्यात महत्त्वपूर्ण दौरा संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वनपट्टे धारक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून 'अ‍ॅग्रीस्टॅक' फार्मर आयडी नोंदणी संदर्भात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच आगामी खरीप व रब्बी हंगामाच्या नियोजनाबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

     दौऱ्यापूर्वी ठाणे येथे जिल्हास्तरावरील मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अचूक आरोग्य पत्रिका तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता काय उपाय योजना करता येईल, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच गाव स्तरावर शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मृदा आरोग्य पत्रिकामधील शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करावा, यासाठी अधिकाऱ्यांनी जनजागृतीद्वारे प्रयत्न करण्याच्या सूचना मा. सचिव महोदयांनी उपस्थितांना दिल्या.




*'जय भवानी शेतकरी उत्पादक गटाला' भेट आणि कौतुक..*

     सचिवांनी पाणी फाउंडेशन 'फार्मर कप' अंतर्गत कृषी विभागामार्फत स्थापन झालेल्या 'जय भवानी भात शेतकरी उत्पादक गट, खरीवली सो.' येथील गटाला भेट दिली. यावेळी गटामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची त्यांनी पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेले गोकृपा अमृत व जीवामृत, SRT (सगुणा राईस तंत्रज्ञान) भात लागवड पद्धत आणि गटामार्फत करण्यात आलेली एकत्रित भात बियाणे खरेदी यांचा समावेश होता. या सेंद्रिय आणि किफायतशीर शेती पद्धतींबद्दल त्यांनी गटातील शेतकऱ्यांचे विशेष कौतुक केले.

*"शेती प्रयोगांची प्रत्यक्ष पाहणी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती"*

     या दौऱ्यात सचिव महोदयांनी स्थानिक शेतकरी श्री. मनोज हरड यांच्या शेताला भेट देऊन, त्यांनी पाणी बचतीसाठी व उत्पादकतेसाठी तयार केलेले कूपनलिका पुनर्भरण (Borewell Recharge) आणि SRT गादीवाफे (Raised Beds) यांची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांच्या प्रयोगशीलतेचा गौरव केला.

     या दौऱ्यादरम्यान कृषी क्षेत्रातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने श्री. अंकुश माने  (संचालक, फलोत्पादन, महाराष्ट्र राज्य), श्री. शिवाजी आमले (विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे), श्री.रामेश्वर पाचे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक 'आत्मा', ठाणे), श्री.विनायक पवार (प्रकल्प संचालक 'आत्मा', पालघर), श्रीम.वंदना शिंदे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड), श्रीम.मनाली तांबडे (प्रकल्प उपसंचालक 'आत्मा'), श्री.आशिष बालगुडे (उपविभागीय कृषी अधिकारी, कल्याण) आणि श्री. कुमार जाधव (तालुका कृषी अधिकारी, शहापूर) यांच्यासह तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

       शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी 'फार्मर आयडी' नोंदणी मोहीम यशस्वी करावी. तसेच मृदा आरोग्य पत्रिका मधील शिफारशीनुसार खतांच्या संतुलित वापराबरोबरच शेतावरच तयार केलेल्या नैसर्गिक शेती निविष्ठांचा वापर करावा, असे आवाहनही याप्रसंगी कृषी विभागाकडून करण्यात आले.

🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏 


       मेरा देश मेरा वतन समाचार 


                    🙏 पत्र के🙏


        संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी


नोट........ 👉🙏


 दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏


जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏



#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏



Comments

Popular posts from this blog

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी)

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी) वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना: सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के संपर्क विवरण वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना भारत सरकार की एक महत्वपूर्ण पहल है, जो राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) के तहत लाभार्थियों को देशभर में किसी भी उचित मूल्य की दुकान (FPS) से सब्सिडी वाले अनाज प्राप्त करने की सुविधा प्रदान करती है। यह योजना सभी 36 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में लागू है, जिसमें असम हाल ही में शामिल हुआ है। योजना के तहत राशन कार्ड को आधार से सीड करने की आवश्यकता होती है। योजना से संबंधित शिकायतों, जानकारी या सहायता के लिए राष्ट्रीय स्तर पर टोल फ्री हेल्पलाइन नंबर 14445 उपलब्ध है। इसके अलावा, सामान्य PDS हेल्पलाइन नंबर 1967 है। कुछ राज्यों में अतिरिक्त स्थानीय नंबर भी हैं। नीचे सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के मुख्य संपर्क विवरण दिए गए हैं (मुख्यालय का पता, फोन नंबर और ईमेल जहां उपलब्ध)। ये विवरण आधिकारिक स्रोतों से संकलित हैं। यदि आपको मोबाइल नंबर की आवश्यकता है, तो आधार से लिंक्ड रजिस्टर्ड मोबाइल का उपयोग करें, क्योंकि योजना में...

हाइब्रिड टेक्नोलॉजी फ़ॉर एन्हान्सिंग क्रॉप प्रॉडक्टिविटी नामक विषय पर तीन दिवसीस नैशनल सिम्पोज़ियम (संगोष्ठी) का आयोजन

 हाइब्रिड टेक्नोलॉजी फ़ॉर एन्हान्सिंग क्रॉप प्रॉडक्टिविटी नामक विषय पर तीन दिवसीस नैशनल सिम्पोज़ियम (संगोष्ठी) का आयोजन दि ट्रस्ट फ़ॉर एडवांसमेंट ऑफ़ एग्रीकल्चरल साइंसेस (टास) द्वारा भारतीय कृषि अनुसंधान परिषद् और सी.जी.आई.ए.आर. के इक्रीसैट (इंडिया), इंटरनैशनल मेज़ एंड व्हीट इंप्रूवमेंट सैंटर (सिमिट), मैक्सिको; इंटरनैशनल राइस रिसर्च इंस्टीट्यूट, फ़िलिपीन्स और इंडियन सोसाइटी ऑफ़ प्लान्ट जैनेटिक रिसोर्सेस जैसे प्रमुख संस्थानों के साथ मिलकर हाइब्रिड टेक्नोलॉजी फ़ॉर एन्हान्सिंग क्रॉप प्रॉडक्टिविटी नामक विषय पर तीन दिवसीय एक नैशनल सिम्पोज़ियम (संगोष्ठी) का आयोजन किया जा रहा है। यह संगोष्ठी राजधानी दिल्ली में पूसा कैंपस के एन.ए.एस.सी. कॉम्प्लैक्स में स्थित ए.पी. शिंदे सिम्पोज़ियम (संगोष्ठी) हॉल में 8 से 10 जनवरी - 2025 तक आयोजित की जा रही है। मुख्य अतिथि के रूप में माननीय प्रधानमंत्री, श्री नरेन्द्र मोदी के प्रिंसिपल सैक्रेट्री, डॉ. पी.के. मिश्रा ने इस संगोष्ठी का शुभारंभ किया। भारतीय कृषि अनुसंधान परिषद् के महानिदेशक, डॉ. हिमांशु पाठक के साथ प्रॉटेक्शन ऑफ़ प्लान्ट वैराइटीज़ एंड फ़ार्मर्...

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी प्रचार (campaign) बंद होण्याची तारीख आणि वेळ: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ही निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे (मतदान ७:३० AM ते ५:३० PM पर्यंत).

 भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। 29 महानगरपालिकाओं (जिसमें BNCMC भी शामिल है) के लिए एक ही चरण में चुनाव हो रहे हैं। सामान्य नियमों के अनुसार, प्रचार मतदान शुरू होने से ठीक पहले मतदान के दिन सुबह 7:30 बजे तक बंद हो जाता है (यानी 15 जनवरी 2026 को सुबह 7:30 बजे से प्रचार पूरी तरह प्रतिबंधित)। कुछ स्थानीय निकायों में प्रचार पिछले दिन रात 10 बजे तक बंद होता है, लेकिन महानगरपालिका चुनावों (जैसे BMC, BNCMC आदि) के लिए आधिकारिक रूप से प्रचार समाप्ति मतदान शुरू होने के समय (15 जनवरी सुबह 7:30 बजे) मानी जाती है। मुख्य तिथियाँ (संक्षेप में): नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि: 30 दिसंबर 2025 नामांकन की जांच: 31 दिसंबर 2025 नाम वापसी की अंतिम तिथि: 2 जनवरी 2026 अंतिम उम्मीदवार सूची: 3 जनवरी 2026 मतदान: 15 जनवरी 2026 (7:30 AM से 5:30 PM) मतगणना: 16 जनवरी 2026 प्...