Skip to main content

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 33 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन, उद्घाटन संपन्न*


*आजचा दिवस महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण करणारा*

          *-पंतप्रधान नरेंद्र मोदी*



*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 33 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन, उद्घाटन संपन्न*

 

*विकासकामांमुळे मुंबई आणि ठाण्याची ओळख होणार आधुनिक*

  


*ठाणे, दिनांक :- 05ऑक्टोबर 2024 :-* आज महायुती सरकारने मुंबई-एमएमआरमध्ये 33 हजार कोटींहून अधिकचे प्रकल्प सुरू केले आहेत. आज 12 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रोची पायाभरणीही झाली आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र, नैना प्रकल्प, छेडानगर ते आनंदनगर असा उन्नत ईस्टर्न फ्री-वे, ठाणे महापालिकेचे नवीन मुख्यालय, अशा अनेक मोठ्या विकासकामांची पायाभरणीही आज करण्यात आली. या विकासकामांमुळे मुंबई आणि ठाण्याची आधुनिक ओळख होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

        पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी वालावलकर सभा मैदान, बोरीवडे गाव, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे 33 हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे ऑनलाईन भूमीपूजन व उद्घाटन तसेच “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या महिला लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.


       या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पहिली भूमिगत मेट्रो - कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मुंबई मेट्रो मार्गिका - 3 टप्पा-1 (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानक) शुभारंभ, ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमीपूजन, पूर्व मुक्त मार्ग विस्तार छेडा नगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे प्रकल्पाचे भूमीपूजन, नैना नगर रचना परियोजनांतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचे भूमीपूजन, ठाणे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार, असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.

      यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ, विधानपरिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार गणेश नाईक, संजय केळकर, प्रताप सरनाईक, किसन कथोरे, डॉ.बालाजी किणीकर, शांताराम मोरे, महेश चौघुले, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, तसेच आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, गीता जैन आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिकांचे आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

       पंतप्रधान श्री.मोदी पुढे म्हणाले की, आज एक मोठी आनंदाची बातमी घेवून महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने आपल्या मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ज्या परंपरेने देशाला ज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि साहित्याची समृद्ध संस्कृती दिली आहे त्याचा हा सन्मान आहे. त्याबद्दल मी देशातील आणि जगातील सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन करतो.

       “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेबद्दल बोलताना त्यांनी या योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना महिना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत, ही योजना महाराष्ट्रात अत्यंत यशस्वी होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून ते म्हणाले, नवरात्रीच्या काळात एकापाठोपाठ एक अनेक विकास कामांची उद्घाटने आणि पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला मिळत आहे. ठाण्याला पोहोचण्यापूर्वी मी वाशिमला होतो. तेथे मला देशातील 9.5 कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी जाहीर करण्याची आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. आता महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाचे अनेक मोठे विक्रम ठाण्यात निर्माण होत आहेत. मुंबई-एमएमआर आणि महाराष्ट्राच्या विकासाचा हा सुपरफास्ट वेग आज महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची झलक देत आहे. आजच आरे ते बीकेसी, मुंबई या ॲक्वा लाइन मेट्रोचेही उद्घाटन होत आहे. अनेक दिवसांपासून मुंबईतील लोक या लाईनची वाट पाहत होते. आज मला जपान सरकारचेही आभार व्यक्त करायचे आहेत. या प्रकल्पासाठी जपानने जपानी आंतरराष्ट्रीय सहकार्य एजन्सीमार्फत भरपूर सहकार्य केले आहे. त्यामुळे एक प्रकारे ही मेट्रो भारत-जपान मैत्रीचेही प्रतीक आहे.

आज प्रत्येक देशवासियाचे एकच ध्येय आहे - विकसित भारत! त्यामुळे आपल्या सरकारचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक संकल्प, प्रत्येक स्वप्न विकसित भारताला समर्पित आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुंबई-ठाण्यासारखी शहरे भविष्यात सज्ज करायची आहेत.

     ते म्हणाले की, आज मुंबई महानगरात सुमारे 300 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे तयार होत आहे. आज मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास कोस्टल रोडने 12 मिनिटांत पूर्ण होत आहे. अटल सेतूने दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतरही कमी केले आहे. ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भूमिगत बोगद्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. असे अनेक प्रकल्प आहेत. वर्सोवा ते वांद्रे सागरी सेतू प्रकल्प, ईस्टर्न फ्रीवे, ठाणे-बोरिवली बोगदा, ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प अशा प्रकल्पांमुळे या शहरांचा चेहरामोहरा बदलत आहे. मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील समस्या कमी होतील. येथे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, येथे उद्योगधंदे वाढतील.

       महामार्ग, द्रुतगती मार्ग, रस्ते आणि विमानतळांच्या विकासातही आम्ही विक्रम केला आहे आणि 25 कोटी गरीब लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे, असे सांगून आता देशाला खूप पुढे न्यायचे आहे. सर्व मिळून महाराष्ट्राची स्वप्ने पूर्ण करू, या शब्दात सर्व विकास प्रकल्प आणि विकासकामांच्या पूर्णत्वासाठी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

      कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी पैठणी शाल, महाराष्ट्राची ओळख असलेला पैठणी फेटा तसेच ठाण्यातील श्री कोपिनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची प्रतिकृती व ठाण्याच्या दुर्गेश्वरी मातेची प्रतिमा देवून स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध निवेदिका मानसी सोनटक्के यांनी केले.

*या प्रकल्पांचे झाले भूमीपूजन व उद्घाटन…*

महाराष्ट्रासाठी ₹33,000 कोटींच्या वेगवान विकासाची भेट

• सुमारे 12 लाख प्रवाशांची रोज वाहतूक.       

• आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स 12.69 किमी

• एकूण 10 स्थानके (7 भूमिगत 1 जमीन स्तरावरील स्थानक)

 

महाराष्ट्रातील पहिली भूमिगत मेट्रो

• कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मुंबई मेट्रो मार्गिका - 3 टप्पा-1 (आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्स स्थानक) शुभारंभ.

 

मुंबई प्रवासात... वेळ आणि इंधन कपात

• पूर्व मुक्त मार्ग विस्तार छेडा नगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे प्रकल्पाचे भूमिपूजन

• दक्षिण मुंबई-ठाणे प्रवास वेगवान होणार

• ठाणे, नवी मुंबई आणि पूर्व उपनगराला दक्षिण मुंबईशी जोडणारा उन्नत मार्ग

• छेडा नगर ते आनंद नगर, ठाणे दरम्यान 13.40 किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग विस्तार

 

सुनियोजित शहराची उभारणी, आरामदायी जीवनमानाची हमी!

• नैना नगर रचना परियोजनेंतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन

• जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळाल्याने शहरांचा सुसज्ज विकास

• प्रथम टप्प्या अंतर्गत 42 चौ. कि.मी. क्षेत्राचा विकास

• 9 उड्डाणपूल, 12 लहान पूल, 26 पादचारी भुयारी मार्ग, 1 वाहन भुयारी मार्ग आणि एकूण 17.59 कि.मी. लांबीच्या रस्त्याचा समावेश

 

सक्षम महिला... विचार पहिला

• मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार

• महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळाली गती

• लाभार्थी महिलांना लाभाचे प्रातिनिधिक वितरण

• आत्तापर्यंत 1.96 कोटी भगिनींना लाभाचे वितरण

 

प्रशस्त इमारत करेल नागरिकांचे स्वागत

• ठाणे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

• एकाच इमारतीत सर्व कार्यालय असल्याने नागरिकांना सुविधा मिळणार

• किल्ल्याच्या स्वरूपात इमारतीची रचना

• आधुनिक कार्यक्षमतेची 32 मजल्याची प्रशासकीय इमारत व महासभेची 5 मजली इमारत ? 

🙏👇👇👇👇👇👇👇👇👇🙏


           देश मेरा वतन समाचार पत्र 


         संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी 

नोट........ 

दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, जिसके लिए आप हमारे इस आर्टिकल को लाइक शेयर व कमेंट जरूर करेंगे । 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

30 सितंबर से 31 अक्टूबर 2024 तक बढ़ा दिया गया हैतक कर लें राशन कार्ड की E-KYC, वरना नहीं मिलेगा फ्री राशन ?

 महाराष्ट्र जिला ठाणे भिवंडी शहर में राशन कार्ड   E-KYC करवाले और व सभी राज्यों में भी नगरीकों E-KYC करें 30 सितंबर से  31 अक्टूबर 2024 तक बढ़ा दिया गया है तक कर लें राशन कार्ड की E-KYC, वरना नहीं मिलेगा फ्री राशन  अगर जिन्होंने राशन कार्ड में ई केवाईसी नहीं किया तो नाम डिलीट हो सकते हैं जल्द से जल्द अपने नजदीकी राशन दुकान पर जाकर ई केवाईसी करवा ले अगर राशन कार्ड में ई केवाईसी नहीं करवाते हैं तो उसकी जवाबदारी खुद राशन कार्ड धारक होगा ?  घर से दूर रहने वालों की नहीं हो रही है ई-केवाईसी, अब परिवारों को राशन बंद होने का डर घर से दूर रहने वालों की नहीं हो रही है ई-केवाईसी, अब परिवारों को राशन बंद होने का डर जिन लोगों के फिंगर प्रिंट या आई स्कैन नहीं हो पा रहे हैं उनके लिए अलग से कोई गाइडलाइन नहीं है. बच्चों के आधार कार्ड राशन कार्ड से लिंक नहीं हैं. उनकी भी ई-केवाईसी नहीं हो रही है. ओटीपी सिस्टम भी नहीं है. घर से दूर रहने वालों की नहीं हो रही है ई केवाईसी, अब परिवारों को राशन बंद होने का डर  सरकार ने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना में चयनित उपभोक्ताओं के लि...

बदल गए राशन कार्ड के सभी नियम, नए नियम जारी

 बदल गए राशन कार्ड के सभी नियम, नए नियम जारी  भारत सरकार द्वारा राशन कार्ड धारकों को समय-समय पर फ्री राशन प्रदान किया जाता है, लेकिन हाल ही में सरकार ने राशन वितरण के नियमों में महत्वपूर्ण बदलाव किए हैं। अगर आप भी राशन कार्ड धारक हैं और फ्री राशन का लाभ उठाते हैं, तो यह बदलाव जानना आपके लिए बहुत जरूरी है। सरकार ने राशन वितरण प्रणाली में सुधार के लिए यह बदलाव किए हैं, ताकि इस योजना को और अच्छा बनाया जा सके। नए नियमों के बारे में महत्वपूर्ण जानकारी सरकार ने राशन वितरण प्रणाली में जो बदलाव किए हैं, उसके अंतर्गत सभी उपभोक्ताओं को समय पर अपना राशन लेना अनिवार्य होगा। अब राशन कार्ड धारकों को निर्धारित समय सीमा के भीतर ही अपना राशन प्राप्त करना होगा, अन्यथा वे उस महीने का राशन प्राप्त नहीं कर सकेंगे। यह एक महत्वपूर्ण निर्देश है जिसे केंद्र और राज्य सरकार ने लागू किया है। राशन वितरण में बदलाव पहले राशन उपभोक्ता कुछ महीने तक अपना राशन नहीं लेते थे और बाद में एक साथ दो या तीन महीने का राशन प्राप्त कर सकते थे। लेकिन नए नियमों के तहत यह संभव नहीं होगा। अब उपभोक्ताओं को हर महीने अपना निर्ध...

Aadhar Npci Link Benefits

 आधार एनपीसीआई बैंक खाते में लिंक कैसे करें देखिए  अगर आप भारतीय नागरिक है तो आपके पास आधार कार्ड जरूर होगा और आपके आधार कार्ड में आपका कौन सा बैंक खाता जुड़ा है या अभी तक नहीं जुड़ा है तो कैसे घर बैठे ही बैंक खाता आधार के साथ लिंक कर सकते हैं  इसकी पूरी प्रक्रिया आज हम आपको विस्तार से बताने वाले हैं अगर आपका कोई सा भी बैंक है तो आप ऑनलाइन घर बैठे ही आधार एनपीसीआई से लिंक कर सकते हैं, आज हम आपको ऑनलाइन घर बैठे बैंक खाते में आधार एनपीसीआई और डीबीटी चालू करने का तरीका बताने वाले हैं अब आप अपने किसी भी बैंक को आधार के साथ लिंक कर सकते हैं, अगर आपके पास एक से अधिक बैंक खाते हैं तो आप अपने हिसाब से कोई सा भी बैंक खाता आधार के साथ एनपीसीआई माध्यम से लिंक कर सकते हैं, Aadhar Npci Link Benefits  बैंक खाते में आधार एनपीसीआई लिंक करने से सरकार के द्वारा दिया गया सभी सरकारी फायदा पहुंच जाता है यानी बैंक खाते में आसानी से प्राप्त हो जाता है और आधार के माध्यम से लेनदेन हो सकता है और आधार से संबंधित कोई भी ट्रांजैक्शन किया जा सकता है इसी वजह से बैंक खाते में आधार एनपीसीआई लिंक करन...