जिल्हा परिषद, ठाणे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दाभाड येथे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोककेंद्रित करण्यासाठी प्रशिक्षणावर भर
जिल्हा परिषद, ठाणे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दाभाड येथे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोककेंद्रित करण्यासाठी प्रशिक्षणावर भर ठाणे, दि. १५ ऑक्टोबर, २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा’ (Comprehensive Primary Health Care – CPHC) प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, दाभाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. ठाणे जिल्ह्यामध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, या कार्यक्रमाचे तांत्रिक पर्यवेक्षण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे करत आहेत. या प्रशिक्षणामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आशा स्वयंसेविका यांनी बहुसंख्येने सहभाग घेतला. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे, गुणवत्तापूर्ण आणि नागरिककेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून ...