जिल्हा परिषद मुख्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची आकस्मिक उपस्थिती तपासणी गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश; कार्यालयीन शिस्तीबाबत प्रशासन गंभीर
*जिल्हा परिषद मुख्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची आकस्मिक उपस्थिती तपासणी* *गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश; कार्यालयीन शिस्तीबाबत प्रशासन गंभीर* ठाणे, दि. 05 जून 2026 (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषद प्रशासनातील कार्यालयीन शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी आज, दि. ०५ जून, २०२६ रोजी जिल्हा परिषद ठाणे मुख्यालयात आकस्मिक भेट देऊन विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध विभागांतील हजेरी पत्रकांची पाहणी करून प्रत्यक्ष उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांची पडताळणी केली. कार्यालयीन वेळेत अनुपस्थित अथवा विनापरवानगी गैरहजर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाहणीदरम्यान विविध विभागांतील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून येणाऱ्या अर्ज, तक्रारी व प्रकरणांचा निपटारा वेळेत होणे, कार्यालयीन कामकाजात अनावश्यक विलंब टाळणे तसेच प...