इस्कॉन भिवंडी येथे भव्य “आंबा महोत्सव” उत्साहात संपन्न, १०,००० हून अधिक भाविकांनी घेतले दर्शन भिवंडी : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (ISKCON Bhiwandi) आयोजित भव्य “आंबा महोत्सव” मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या दिव्य महोत्सवात सुमारे १०,००० हून अधिक भाविकांनी श्री श्री राधा माधव यांचे विशेष दर्शन घेऊन त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त केला. महोत्सवानिमित्त भगवान आणि मंदिर परिसराची विविध प्रकारच्या आंब्यांनी आकर्षक व भव्य सजावट करण्यात आली होती, जी भाविकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. दिवसभर हरिनाम संकीर्तन व विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रात्री ८:३० नंतर भगवानांना अर्पण करण्यात आलेल्या आंब्यांचा प्रसाद उपस्थित सर्व भाविकांना वितरित करण्यात आला. मंदिर प्रमुख श्री सुदामा प्रभूजी यांनी सर्व भक्त, स्वयंसेवक व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. हरे कृष्ण.🙏 🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏 मेरा देश मेरा वतन समाचार 🙏 पत्र के🙏 ...