*छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026* *खेळाडूंच्या मिरवणूकीने व्हॉलीबॉल स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ* *बदलापूरमधील पाहुणचाराने भारावले राज्यभरातील क्रीडापटू*
*छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026*
*खेळाडूंच्या मिरवणूकीने व्हॉलीबॉल स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ*
*बदलापूरमधील पाहुणचाराने भारावले राज्यभरातील क्रीडापटू*
ठाणे,दि.13 मे 2026 ढोल-ताशाचा गजरात मराठमोळे फेटे परिधान करीत उत्साहपूर्ण मिरवणूकीने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा बदलापूर शहरात आज शानदार प्रारंभ झाला. डिजीटल वॉटर बॉटलने स्वागत, विद्युतप्रकाश झोतातील सामने, थेट प्रेक्षपणासह बदलापूरमधील पाहुणचाराने राज्यभरातील खेळाडू भारावून गेल्याचे दिसून आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला आजपासून दिमाखदार सुरूवात झाली. हेंद्रेपाडामधील बदलापूर जिमखाना मैदानावर रंगलेल्या स्पर्धेचा प्रारंभ खेळाडूंच्या मिरवणूकीने करण्यात आला. बदलापूरमधील शिवशंभू वाद्य पथकाच्या जल्लोषात फेटे परिधान केलेल्या खेळाडूंची मिरवणूक लक्षवेधी ठरली.
कुळगाव-बदलापूर नगरपरिषद माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, नगरसेवक किरण भोईर यांनी केले. यावेळी मुख्यधिकारी मारूती गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव निलेश जगताप व ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते.
बदलापूर जिमखानापासून सुरू झालेली मिरवणूक साई चौक, गणपती चौक मार्गे झेंडा चौकात आल्यानंतर क्रीडामय वातावरणात स्पर्धा स्थळी समाप्त झाली. दिड किमी अंतराच्या मिरवणूकीने हेंद्रेपाडा परिसर क्रीडामय झाल्याची अनुभुती उपस्थितींना आली.
दुपारच्या सत्रात स्पर्धेतील सहभागी अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर विभागातील पार्श्वभूमीवर प्रशिक्षक व व्यवस्थापकांची बैठक पार पडली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत , नगरसेवक किरण भोईर , महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव निलेश जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील उत्कृष्ट व्हॉलीबॉल प्रतिभेचा संगम या स्पर्धेत पाहायला मिळणार असे किरण भोईर यांनी यावेळी सांगितले.
आमदार किसन कथोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून ही मानाची राज्यस्तरीय स्पर्धा प्रथमच अंबरनाथ बदलापूर परिसरात आयोजित करण्यात येत असून, त्यामुळे प्रथमच स्थानिक खेळाडू, क्रीडाप्रेमी व युवकांना राज्यस्तरीय दर्जाच्या स्पर्धेची पार्वणी पहाण्यास मिळाली आहे. १३ ते १७ मे २०२६ कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी राज्यतील ८ विभागातील ३८४ खेळाडूंचा थरार रंगणार आहे.
चौकट
*डिजीटल वॉटर बॉटलने भारावले खेळाडू*
बदलापूरमधील राज्य व्हॉलीबॉल स्पर्धातील सहभागी सर्व ३२ संघाच्या ३८४ खेळाडूंनी स्मरणीय भेटवस्तू देत स्वागत करण्यात आले. डिजीटल डिजीटल वॉटर बॉटलसह सॅक, कॅप आणि ओआरएसची पाकिटे खेळाडूंना देण्यात आली. तापमान दर्शविणाऱ्या डिजीटल वॉटर बॉटलने खेळाडू भारावून गेले होते. प्रथमच तापमान दर्शविणारी पाण्याची बाटली खेळाडूंच्या हाती आली होती. भर उन्हाळ्यात बदलापूरचे तापमान किती हे क्षणात खेळाडूंना समजून आले. तसेच उन्हापासून सरंक्षण होण्यासाठी ओआरएसची पाकिटे दिल्याने खेळाडू खुश असल्याचे दिसून येत होते.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏





Comments
Post a Comment